Friday, March 29, 2013

"पाचाड(रायगड) येथील जिजाऊंचा वाडा"

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स. १४ मे, १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे' निधन, संभाजीराजांच्या लहान वयात झाल्यामुळे त्यांच्या पालनपोषनाची जबाबदारी जिजाऊंनी पार पाडली.पुढे संभाजीराजा इतिहासातील एक थोर,बुध्दिमानी,अजिंक्य पराक्रमी राजा म्हणून उदयास आला.

तिकडे दक्षिणेत आपल्या जनतेची काळजी शहाजीराजे अगदी पुत्रासारखी घेत होते.आपल्या प्रजेची जंगलातील नरभक्षक वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे बेंगलोर नजिकच्या होदेगिरीच्या जंगलात गेले होते.वाघाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून त्यांचा दुदैवी मृत्यु झाला.ही दुदैवी घटना इ.स.२३ जानेवारी १६६४ रोजी घडली.

अशा दु:खद प्रसंगी पतीविरहाचे दु:ख बाजूला ठेवून जिजाऊंनी स्वराज्याच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले.या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची,स्वराज्यप्राप्तीची,गुलामगिरीतून लोकांना सोडविण्याची प्रबळ प्रेरणा होती.स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.

राज्याभिषेक.

इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.

आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'


श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.

"पाचाड(रायगड) येथील वाड्यातून दिसणारे रायगड किल्ल्याचे विहंगम दृश्य"

।।लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू।।

छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला.छत्रपती राजर्षी शाहूंचे पूर्वाश्रमाचे नाव यशवंतराव होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्युनंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.लहानपणापासून ते शरीरयष्टीने तगडे व बलवान होते.विद्यार्थीदशेत त्यांनी विविध भाषेवर प्रभुत्व मिळविले.त्यांचे शिक्षण राजकोट,धारवाड येथे झाले.
बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांना राजाराम,शिवाजी हे मुलगे तर आक्कासाहेब,आऊबाई या दोन कन्या होत्या.सन १८९७-९८ साली पडलेल्या दुष्काळ व प्लेगच्या साथीचा त्यांनी कुशलपुर्वक मुकाबला करून प्रजेला त्यातून बाहेर काढले.



वेदोक्त प्रकरण
सन १८९९ साली कोल्हापूरातील धर्मपंडितानी शाहूंना शुद्र ठरवून त्यांचे क्षत्रियत्व अमान्य केले आणि शाहूंचा वेदमंत्राचा अधिकार नाकारला.अशावेळी शाहूंनी कठोर निर्णय घेऊन ब्रह्मवर्गांची वतने बरखास्त केली.वेदोक्त प्रकरणामुळे त्या काळात महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते.

महाराणी ताराबाई.


ताराबाई:
(? १६७५-९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३-८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले. मोगलांचा रायगडास वेढा पडला असता, जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी ताराबाईने राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेल्या नंतर ताराबाई व तिच्या इतर सवती रामचंद्र नीलकंठाच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. रामचंद्रपंतांच्या सहवासात ताराबाईला मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या. ९ जून १६९६ ला ताराबाईला मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी. राजाराम जिंजीहून निसटल्या नंतर ताराबाई आणि तिचे नातेवाईक जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले. त्यांना जुल्फिकारखानने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी ताराबाई व तिच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी राजाराम मृत्यू पावला. त्यानंतर ताराबाइंच्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात झाली.
शाहू मोगलांच्या कैदेत असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतीच्या गादीवर सांगू लागली. रामचंद्रपंताने शाहूची बाजू उचलून धरली, तेव्हा तिने परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण यांना आपल्या बाजूस वळवून घेतले आणि शिवाजीची मुंज करून विशाळगड येथे त्याला राज्यभिषेक करविला. ती आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागली. सैन्याधिकारी नेमून तिने औरंगजेबाशी उघड सामना सुरू केला. १७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर तिने पन्हाळा ही राजधानी केली. मध्यंतरी ताराबाईने औरंगजेबाशी बोलणी सुरू करून मुलासाठी  मनसब व दक्षिणेची देशमुखी अशा मागण्या केल्या. ही बोलणी फिसकटताच तिने जिद्दीने मोगलांशी लढा चालू ठेवला. गडागडांवर जाऊन ती जातीने पाहणी करी. सरदारांना सल्ला देई. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे, म्हणून तिने उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली. १७००—०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईच्या सैन्याने परत मिळविले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आला. तो तोतया नसून खरा शाहू आहे, याची खात्री ताराबाईने करून घेतली. मग पुन्हा मोगलांकडे त्यांची जमीनदार म्हणजे अंकित राहण्यास कबूल असल्याचा अर्ज केला, पण प्रथम तो फेटाळला गेला. पुढे त्यास संमती देण्याचा प्रयत्न झाला. पण तो निरुपयोगी ठरला. शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले. बाळाजी विश्वनाथाने ताराबाईच्या पक्षातील चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर इ. मातब्बर सरदार मंडळींना आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४ मध्ये राजसबाईने आपला मुलगा संभाजी यास पन्हाळ्यास छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी यांना अटकेत टाकले. शिवाजी १७२७ मध्ये बंदिवासातच मेला. पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली. तेव्हा शाहूने तिला मानाने वागविले. ती पुढे साताऱ्यास रहावयास गेली. १७४९ पर्यंत तिचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले.
आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून तिने शाहूचे मन वळविले. शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला सातारच्या गादीवर बसविले. त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा तिने प्रयत्न केला. रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पहाताच तिने तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला, रामराजास त्रास देई. १७५० मध्ये साताऱ्यात असता तिने रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने तिने साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी ताराबाईशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्यावर सैन्य नेताच ती पेशव्यांना शरण गेली. १७६० मध्ये संभाजी मेल्यामुळे पुन्हा वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपतचा पराभव (१७६१) ऐकल्यावर बरे झाले, असे पेशव्यांविषयी उद् गार काढून तारबाई मरण पावली. ताराबाई हुशार, राजकारणी व कारस्थानी होती. स्वतःचे हेर ठेऊन ती आपल्या विरूद्ध पक्षातील माहिती काढीत असे. तिचे खरे कतृत्व १७०० -०७ या निर्णायकी काळात दृष्टीस पडले. वैयक्तिक महत्वाकांक्षेपायी तिने निजामासारख्या  मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही. राजारामाच्या वारसाहक्कासाठी भांडून तिने कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. शाही स्वराज्यात येण्यापूर्वी तिने कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली. परंतु त्यानंतर मात्र तिचे उर्वरित आयुष्य घरगुती कलहात गेले.. 

संदर्भः Kishore, Brij, Tara Bai and Her Times, Bombay, 1963.

मुरुड जंजिरा.

मुरुड जंजिरा वरील आक्रमण.
ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.     
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.   
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची  सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.
      संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात  पाठवले होते. दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.” मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.

छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा.

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
मराठी मध्ये अर्थ:
शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

गोवेकर पोर्तुगीजांवर वचक.

गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई

गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.   
पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंटी दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नर ला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.
ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड  किल्ल्यावर होते. गव्हर्नर ला हि बातमी माहित होती. गव्हर्नर ला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ५ हजाराचे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.
गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.
दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नर च्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.   
पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.
आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”
फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तत्बाडीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||”   
संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. आत्ता पर्यंत गव्हर्नर ने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले.  किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.   
गोव्याचा गव्हर्नर Count De Alwore याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते.
मराठ्यांचे गोव्यावरील आक्रमण इतके जबरदस्त होते कि, गोव्याच्या गव्हर्नर ला त्याची राजधानी पणजी पासून खाली मार्मा गोव्याला हलवावी लागली.
संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. मागील काही वर्षात पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक देवळे उध्वस्त केली होती, याचाच सूड घेण्यासाठी गोव्यातील काही हिंदू लोक एकत्र आले आणि त्यांनी गोव्यातील ख्रिश्चनांच्या एका चर्चवर हल्ला केला, त्या चर्च ची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. हि बातमी शंभू राजांच्या कानावर आली, परंतु स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आणि परधर्माबद्दल आदर असलेले संभाजी राजे यांना हि बातमी आवडली नाही. ते म्हणाले, “आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हे स्वराज्य कोणाच्या धर्माच्या द्वेषावर उभे राहिलेले नाहीये.” छत्रपती संभाजी महाराज यांनी हुकुम दिला कि, “ताबडतोब चर्च ची जाळपोळ थांबवा”. शंभू राजांच्या आज्ञेचे पालन केले गेले. संभाजी महाराज यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही हिंदु लोकांना धर्मात परत घेतले.
गव्हर्नर आधीच पणजी सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगड ला परत आले.

आरमार उभारणी.

“ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.
आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.
जहाज बांधणीचे काम सुरु केले.
पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.

आद्मापत्र.

आद्मापत्र - दि.0५ ऑक्टोबर १६८७ रोजी संभाजीराजे सर्जेराव जेध्यांना कड़क शब्दात आद्मापत्र लिहितात - " स्वामीकृपा होउन आपले वतन देशमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होइल तरी आपण एकनिष्ठ होउन सेवा करीन म्हणुन तरी तुमचा मुद्दा मामलेहवालदार (संताजी निंबाळकर) यांनी स्वामीचे सेवेसी हुजुर लिहिला त्यावरून कळो आला। त्यावरून हे आद्मापत्र तुम्हास लिहिले आहे। तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली, की वतनदार होउन इमाने इतबारे वर्तावे। ते गोष्ट न करीता स्वामींचे (शिवाजी महाराज ) अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेत की, स्वामीच्या पायासी दुर्बुद्धि धरोन दोन दिवसांचे मुघलत्यांच्याकडे जाऊन राहिले। तुमचा भाऊ शिवाजी जेधे गनिमाकडे गेला ते तुम्हास बारे पाहेना, ऐसे होते तरी तुम्ही येती। ते केले नाहीतरी बरच गोष्ट जाली या उपरही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखेच राहणे। तुमचा हिसाब तो काय? ए क्षणी स्वामी आद्मा करितात तरी गनिमादेखिल तुम्हास कापून काढवितच आहोत हे बरे समजणे। दूसरी गोष्ट की तिथे राहणेच नाही। एकनिष्ठेने स्वामिंच्या पायाजवळी वर्तावे यैसे असले तरी तुम्ही परभारे मुद्दे सांगुन गडकिलीया कड़े शाबीते काय म्हणुन करीता हे गोष्ट स्वमीस मानत नाही। स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आद्मा करायची ते करतील। तरी यैसी गोष्ट करावया प्रयोजन नाही। उजरातीखेरीज दुसरीकडे राबता न करणे। जे वर्त्तमान लिहिणे ते स्वमीस लिहित जाणे। तुमचे ठायी एकनिष्ठाताच आहे ऐसे स्वामीस कळलियावर जे आद्मा करणे ते करून आद्मापत्र सादर होईल तेणे प्रमाणे वर्तणुक करणे। "

असा आहे आपला शंभू राजा.

जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट
युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त
एका महिन्यात तयार करणारा
जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात
८०० मीटर सेतू बांधणारा
आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा
आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना
त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा
त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी
पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून
जल नियोजन करणारा .
उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडू
कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही
स्वराज्यासाठी एकत्र करणारा
इतर धर्मांचा मान सन्मान करणारा
आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा
बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
शिवप्रभुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक
झाल्यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातील
बुर्हाणपूरवर छापा घालणारा
स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण
व अर्थ पुरवठा करणारा
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी
पिक कर्ज योजना राबविणारा
सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा
म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून
तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून
स्वदेशीचा महामंत्र देणारा असा आहे आपला शंभू राजा !!

अजिंक्य रामशेज किल्ला.

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला

नाशिक जवळ दिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या  मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.
शहाबुद्दीन खान ह्याच किल्ल्यावर चांदसितारा  फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक  दिवसात किल्ला घेतो म्हणून.
किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.   
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.
२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.   
फतेह खान
मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.
फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेह खान  आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.   
अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु”  मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.
मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.
फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.
एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.
वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”    
कासम खान
औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.
तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.
कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.